
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे हिंदुस्थानचे नागरीक नसून ते इंग्लंडचे नागरीक असल्याचा आक्षेप घेत भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. नागरीक विभागाचे संचालक बी.सी.जोशी यांनी राहुल गांधी यांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये म्हटलंय की “राहुल गांधी यांचं नाव एका ब्रिटीश कंपनीच्या कागदपत्रांमध्ये सापडलं असून या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी हे ब्रिटीश नागरीक असल्याची तक्रार मिळाली आहे, या तक्रारीवर राहुल गांधी यांनी अधिक खुलासा करावा.” राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी शंका उपस्थित करणाऱ्या भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या आक्षेपानंतर केंद्रीय गृमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. pic.twitter.com/JFxxwjXDQD
— Saamana (@Saamanaonline) April 30, 2019
या तक्रारीच्या आधारे गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.
Has MHA issued Notice on my Complaint to Buddhu on his British Citizenship today?
— Subramanian Swamy (@Swamy39) April 30, 2019
प्रकरण काय आहे ?
इंग्लंडमध्ये बॅकऑप्स नावाच्या कंपनीची 2003 साली नोंदणी झाली होती. हँपशायर भागात या कंपनीचे कार्यालय असून या कंपनीचे संचालक आणि सचिव अशी दोन पदे राहुल गांधी भूषवित असल्याचं तक्रारीत म्हटलं गेलं आहे. या कंपनीने केलेल्या वार्षिक करभरण्यामध्ये राहुल गांधी यांनी त्यांची जन्मतारीख 19/06/1970 असल्याचं सांगिलं आहे. या कागदपत्रांमध्ये राहुल यांनी आपले नागरिकत्व हे ब्रिटीश असल्याचं म्हटल्याचंही तक्रारीत म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्याविरूद्ध अमेठी मदतदारसंघातून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार ध्रुव लाल कौशल यांनी सर्वात पहिल्यांदा राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी आक्षेप उपस्थित केला होता. राहुल गांधी यांचे नाव राऊल विंची असून त्यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचा दावा त्यांनी केला होता. राहुल गांधी यांनी खोटे नाव सांगून आणि खोटे नागरिकत्व दाखवून निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचं ध्रव लाल यांचे म्हणणे होते. या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यासमोर सुनावणी झाली होती मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी ध्रुव लाल यांचे आक्षेप फेटाळून लावले होते.



























































