अमरावतीत बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू

बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकल्याने एका 16 वर्षीय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. ही घटना धारणी तालुक्यात असलेल्या भिलोरी गावात घडली.

अस्मिता भिलावेकर बैलगाडीत बसली होती. अस्मिता ही टेंभुर्णसोंडा येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेची विद्यार्थीनी आहे. अस्मिताचे आई, बाबा, आजी, आजोबा हे मान्सूनवाडी येथील मावशीला दिवाळीनिमित्त भेटण्याकरिता फरळाचे सामान घेऊन बैलगाडीत बसून जात होते. दरम्यान, रस्त्यातच अस्मिताच्या गळ्यातील ओढळणी बैलगाडीच्या चाकात अडकल्याने तिला गळफास लागला. बैलगाडीत बसणार्‍यांनी गळफास सोडविण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र तरीदेखील चाकातून ओढणी काढता आली नाही. परिणामी, अस्मिताचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्माक मृत्यूची नोंद केली आहे. अस्मिताच्या मृत्यूमुळे गावात सर्वत्र शोक पसरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या