
सामना ऑनलाईन । उल्हासनगर
सिनेमामध्ये हिरॉईनचा रोल देतो, रातोरात स्टार होशील, अशी खोटी स्वप्न दाखवून येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर मालाडमध्ये आठ महिने भामटय़ाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आरोपी मेहबूब अली खान (39) याला पोलिसांनी अटक करून पीडित मुलीची सुटका केली आहे. मेहबूब अलीने एक व्हॉट्स ऍप ग्रुप तयार करून त्यात काही मुलींना त्याने ऍड केले. यामध्ये विविध नट, नटय़ांसह काढलेले स्वत:चे फोटो टाकून पीडित अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढले. त्यातून डिसेंबर 2017 ते जुलै 2018 दरम्यान खानने तिला वेगवेगळया ठिकाणी नेऊन अत्याचार केला. त्याने मुलीला स्वत: निर्माता असल्याचे खोटे सांगून तिचा गैरफायदा उठकला. मूळ टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या खानने आणखीन किती मुलींना जाळ्यात ओढले याबाबत पोलीस तपास करत आहेत.































































