दादरमध्ये आज रंगणार मिस ऍण्ड मिसेस सौंदर्य स्पर्धा

512

सामना प्रतिनिधी । मुंबई

सौंदर्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तिगणिक बदलत असली तरी सौंदर्याच्या ठरावीक चौकटींमुळे खऱया सौंदर्याला जाणून घेण्यासाठी आपण मुकत असतो. सौंदर्याची हीच परिभाषा बदलत ‘मिस ऍण्ड मिसेस दादर’च्या माध्यमातून प्रत्येक वयाच्या स्त्रीला स्वतःला जाणून शोधायची आणि सिद्ध करायची संधी देणारी अनोखी स्पर्धा आज 8 जूनला सायंकाळी 6 ते 9 या वेळेत दादरच्या जे. के. बँक्वेट सभागृहामध्ये रंगणार आहे. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.

महिलांना त्यांच्या कलागुणांनुसार योग्य व्यासपीठ मिळावे आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेच सामना वुमन्स क्लबच्या माध्यमातूनदेखील या गोष्टींना प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून दैनिक ‘सामना’च्या विशेष सहकार्याने आणि मनाली कामत यांच्या पुढाकारने ही स्पर्धा होत आहे.

स्त्री विचारातून प्रभावी करत असते हेच लक्षात घेऊन या स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या 40 जणींचे व्यक्तिमत्त्व, हजरजबाबीपणा, समयसूचकता आणि अंतर्गत गुण इत्यादी गोष्टी पडताळल्या जातील. गेल्या दोन महिन्यांमध्ये विविध फेऱया आणि कसोटय़ांमधून शेकडो सहभागी महिलांमधून 40 जणांची निवड करण्यात आली आहे. या 40 जणांची विभागणी चार विविध गटांत केली आहे. स्पर्धेसाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर परीक्षक लाभणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या