
तब्बल 21 वर्षानंतर हरनाज कौर संधूने हिंदुस्थानला मिस युनिव्हर्सचा किताब मिळवून दिला. हरनाजच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा हिंदुस्थानची मान उंचावली होती. मात्र याच हरनाजवर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले असून तिच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यापूर्वी ‘बाई जी कुट्टन गै’ हा सिनेमा केला होता. या सिनेमाची निर्माती ही अभिनेत्री उपासना सिंह आहे. चित्रपटाचे सध्या प्रमोशन सुरू असून हरनाज मात्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेळ देत नसल्याचा आरोप उपासना सिंग हिने केला आहे.
”हरनाजला मी हा सिनेमा ती मिस युनिव्हर्स होण्याआधी दिला होता. तिने हा चित्रपट पूर्ण केला आहे. मात्र आता ती या चित्रपटाचे प्रमोशन करायला तयार नाही. तिने तसे प्रमोशनचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. मात्र आता ती वेळ देत नाही. आपण दिलेल्या शब्दाचा तरी तिने मान राखायला हवा होता. त्यामुळे तिच्या विरोधात मी जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली आहे’, असे उपासना सिंग हिने सांगितले.
”हरनाज मिस युनिव्हर्स नव्हती तेव्हा मी तिला माझ्या चित्रपचाक संधी दिली . याआधीही तिने माझ्या यारा दिया पू बरान मध्ये काम केले आहे. त्यातही हरनाज मुख्य अभिनेत्री होती. ‘बाई जी कुट्टन गै या चित्रपटावर माझे बरेच पैसे लागले आहेत. हा काही कमी बजेचटचा चित्रपट नाही. प्रोडक्शन हाऊसकडून हरनाजला फोन केले जातात मात्र ती त्यांचे फोन उचलत नाही. मेसेजला रिप्लाय देत नाही. हरनाज सगळ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. तिने चित्रपटाचे प्रमोशन न केल्याने आता चित्रपटाची रिलीजची तारिखही बदलावी लागत आहे”, असे उपासना सिंग हिने सांगितले.




























































