असं झालं तर…विमानतळावर वेळेत न पोहोचल्यास…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात किंवा परदेशात जाण्यासाठी फ्लाइटने प्रवास करणाऱयांची संख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे जर फ्लाइटच्या वेळेत पोहोचता आले नाही तर काय कराल.

आधी तुमच्या एअरलाइनच्या सेवा डेस्कवर जा किंवा त्यांना त्वरित कॉल करा. तुम्ही त्यांना जितक्या लवकर कळवाल, तितके चांगले. एअरलाइनशी संपर्क करणे आवश्यक आहे.

तुमची फ्लाइट का चुकली हे शांतपणे आणि स्पष्टपणे संबंधित अधिकाऱयांना समजावून सांगा. एअरलाइन तुम्हाला पुढील उपलब्ध फ्लाइटमध्ये तिकीट बुक करू शकते का हे विचारा.

एअरलाइनमुळे फ्लाइट चुकली असल्यास, ते तुम्हाला पुन्हा तिकीट देऊ शकतात. जर ते पुढील फ्लाइटमध्ये घेऊ शकत नसतील तर त्यांच्या पुढील फ्लाइट्सचा विचार करा.

तुमच्याकडे प्रवास विमा असल्यास, फ्लाइट चुकल्यामुळे झालेल्या नुकसानीसाठी तुम्हाला विमा भरपाई मिळू शकते. हे जाण्यासाठी पॉलिसीच्या शर्ती आणि नियम तपासा.