मिझोराममध्ये निर्माणाधीन पूल कोसळला, 17 मजुरांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिझोराम येथील सैरांग येथे एका रेल्वे पुलाचं बांधकाम सुरू असताना पुलाचा भाग कोसळून 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना एझॉल या राजधानीच्या शहरापासून 21 किमी अंतरावर झाला आहे.

या ठिकाणी रेल्वे पुलाचं बांधकाम सुरू होतं. त्यावेळी ही दुर्घटना घडली. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. कारण, दुर्घटनेवेळी तिथे सुमारे 35 ते 40 जण काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप 17 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ढिगारे हटवण्याचं काम सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून जाहीर केली आहे. मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनीही या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबांप्रति सहवेदन व्यक्त केली आहे.