आजकाल तृतीयपंथीयही आमदार होतात, बच्चू कडू यांचे वादग्रस्त वक्तव्य

जळगाव येथे एका सभेत बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची जीभ घसरली आहे. हल्ली तृतीयपंथीयही आमदार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.

”ज्यांच्या बोलण्यात दम नसतो, ओठावर मिशी नसते. चालतात तेव्हा बाई आहे की पुरुष ते देखील नीट कळत नाही, अशी लोकं देखील आमदार होतात. तृतीयपंथीयही आमदार होतात” असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. त्यानंतर काही क्षणातच त्यांना त्यांची चूक समजली व त्यांनी त्याबाबत माफीही मागितली.

रविवारी जळगाव जिल्ह्यात झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यांनी हे वक्तव्य केलं आहे.