सदा सरवणकर म्हणजे माहीमला लागलेला डाग – महेश सावंत

माहिम मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार सदा सरवणकर यांनी नुकत्याच एका बैठकीत एक वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणालेले की मी निवडणूकीत जरी पराभूत झालो असलो तरी आमदाराला 2 कोटींचा निधी मिळतो पण मला 20 कोटींचा निधी मिळतो. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. माहिम मतदार संघाचे आमदार महेश सावंत यांनी देखील सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला. सरवणकर हे माहिमला लागलेला डाग आहेत अशी जोरदार टीका महेश सावंत यांनी केली. . तसेच याबाबत विधानसभा अध्यक्ष तसेच मुख्यमंत्र्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितल.

ते 40 वर्षे इथे सत्ता गाजवलीत्यांच्यापेक्षा कोणीच मोठा नाही अशी त्यांची भावना होतीमात्र जनतेने त्यांचा भ्रम दूर केलालोकांनी घरी बसण्याचा सल्ला दिलेला असताना देखील 20 कोटींचा निधी त्यांना मिळालामाजी आमदारांना खैरात वाटली जातेमानधन बंद झालंय मग स्वतःचा विकास कसा होणारअसा सवाल आमदार महेश सावंत यांनी उपस्थित केलायतसेचहा वैयक्तिक विकासाचा निधी आहेअसा टोलाही सावंत यांनी लगावला  

सदा सरवणकर यांनी 20 ते 40 वर्षे इथे सत्ता गाजवली, त्यांच्यापेक्षा कोणीच मोठा नाही अशी त्यांची भावना होती. मात्र जनतेने त्यांचा भ्रम दूर केला. लोकांनी घरी बसण्याचा सल्ला दिलेला असताना देखील 20 कोटींचा निधी त्यांना मिळाला. माजी आमदारांना खैरात वाटली जाते, मानधन बंद झालंय मग स्वतःचा विकास कसा होणार, असा सवाल आमदार महेश सावंत यांनी उपस्थित केलाय.