मनसेची 32 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

1526

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आज तिसरी यादी जाहीर केली असून यामध्ये 32 उमेदवारांचा समावेश आहे. मनसेने आतापर्यंत 104 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. मनसेच्या पहिल्या यादीत 27 तर दुसऱ्या यादीत 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता 32 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.

मनसे उमेदवारांची नावे पुढील नावे- भांडुप (पश्चिम)- संदीप जळगावकर, विक्रोळी- विनोद शिंदे, मुलुंड- हर्षदा राजेश चव्हाण, वडाळा- आनंद प्रभू, उरण- अतुल भगत, पिंपरी- के. के. कांबळे, मीरा-भाईंदर- हरीश सुतार, बार्शी- नागेश चव्हाण, सांगोला- जयवंत बगाडे. कर्जत जामखेड- समता इंद्रकुमार भिसे, राजापूर- अविनाश सौंदाळकर, बदनापूर- राजेंद्र भोसले, मुरबाड- ऍड. नितीन देशमुख, विक्रमगड- वैशाली सतीश जाधव, पालघर- उमेश गोवारी, ओवळा माजिवडा- संदीप पाचंगे, उमरगा- जालिंदर कोकणे, पुणे कॅण्टोन्मेंट- मनीषा सरोदे, खेड आळंदी- मनोज खराबी, आंबेगाव- वैभव बाणखेले, शिरूर- कैलास नरके, दौंड- सचिन कुलथे, पुरंदर- उमेश जगताप, भोर- अनिल मातेरे, चाळीसगाव- राकेश जाधव, वसई- प्रफुल्ल ठाकूर, डहाणू- सुनील इभान, देवळाली-सिद्धांत लक्ष्मण मंडाले, लातूर ग्रामीण- अर्जुन वाघमारे, भंडारा- पूजा ठवकर, वरोरा- रमेश राजुरकर, भुसावळ- नीलेश सुरळकर.

आपली प्रतिक्रिया द्या