राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या दिवशी मनसे नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

3223

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्यव्यापी महाअधिवेशन गुरुवारी गोरेगाव येथील नेस्को संकुलात पार पडले. महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला धक्का बसला आहे. फडणवीस सरकारच्या काळात मंत्रालयात आत्महत्या केलेले धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्माबाबा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

आपली प्रतिक्रिया द्या