मोबाईलवर अश्लील मेसेज, फोटो आले; घाबरलेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या

1069

मोबाईलवर सतत अश्लील मेसेज आणि फोटो आल्याने घाबरलेल्या एका दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी एका 12वीतील विद्यार्थ्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात घडली.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मधु सहानी असं या तरुणीचं नाव आहे. मधुला गेल्या सहा मिहिन्यांपासून मोबाईलवर सतत वेगवेगळे मेसेज येत होते. त्यातील बहुतांश मेसेज हे अश्लील आहेत. या प्रकरणामुळे ती खूप त्रासली होती. तिच्या वागण्यात झालेला बदल पाहून कुटुंबीयांनी बुधवारी तिच्याकडे याबाबत विचारणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारी मधुने एका उंच इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली.

पोलीस या प्रकरणाचा सविस्तर छडा लावत आहेत. त्यांचा एका 12वीतील विद्यार्थ्यावर संशय आहे. कारण, त्यानेही मधुला अनेक मेसेज केले आहेत. मधुच्या कुटुंबीयांनीही या विद्यार्थ्यावरचा संशय व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या