आता मोबाईलची रिंगटोन फक्त 25 सेकंद वाजणार

1130

मोबाईलची रिंगटोन आता फक्त 25 सेकंदच वाजणार आहे. या आधी रेंगटोन 30 सेकंद वाजायची, पण रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी मोबाईलची रिंगटोन 25 सेकंद केल्यानंतर आता व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलनेही त्यांच्या ग्राहकांची रिंगटोन 25 सेकंदांची केली आहे. विकसित देशांत रिंगटोन केवळ 25 सेकंदच वाजते.

हिंदुस्थानात सरकारने रिंगटोनचा कालावधी हा 45 सेकंद ठेवला आहे, मात्र रिलायन्सने जिओ रिंगटोनचा कालावधी कमी केल्यामुळे सुरुवातीला व्होडाफोन, एअरटेलनेही त्याला आक्षेप घेतला होता. त्यावर जिओने नमते घेतले नसल्यामुळे नाइलाजाने त्यांनाही रिंगटोन 25 सेकंदांची करावी लागली. रिंगटोनचा कालावधी कमी केल्यामुळे ग्राहकांना अधिक कॉल घेणे शक्य होणार आहे. पण त्यासाठी कंपन्यांना इंटरकनेक्टेड युजेस चार्ज भरावा लागणार आहे. कंपन्या तो चार्ज ग्राहकाकडून वसूल करतील. दरम्यान, रिंगटोनच्या कालावधीवरून 14 ऑक्टोबरला ‘ट्राय’बरोबर दूरसंचार कंपन्यांची बैठक होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या