
मोबाईल हे संपर्काचे साधन असले तरी हल्ली त्याचा कापर लाईट बिल भरण्यापासून ते ऑनलाईन शाळा, कॉलेज अटेंड करणे अशा विविध कामांसाठी होत आहे. अनेक जण तर बिनकामाचेदेखील मोबाईलमध्ये तासन्तास डोकाकताना दिसतात. मोबाईलचा सर्वाधिक वापर करण्यात हिंदुस्थान जगभरात तिसऱया क्रमांकावर आहे. हिंदुस्थानी नागरिक दिवसाला सरासरी चार तास नऊ मिनिटे मोबाईलवर वेळ घालवत असल्याचे नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
झेड डी नेटने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मोबाईल वापराच्या बाबतीत ब्राझीलचे नागरिक प्रथम क्रमांकावर आहेत. ब्राझीलचे नागरिक दररोज सरासरी 5 तास 4 मिनिटे इतका वेळ मोबाईल वापरतात. दुसऱया स्थानावर इंडोनेशिया असून इथले लोक दररोज मोबाईलवर सरासरी 5 तास 3 मिनिटे घालवतात. दक्षिण कोरिया चौथ्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी लोक दररोज 4 तास 8 मिनिटे मोबाईलचा वापर करतात. तर पाचव्या क्रमांकावर मेक्सिकन नागरिक असून ते सरासरी 4 तास 7 मिनिटे मोबाईल वापरतात.



























































