शाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या

1156

वाशिममधील शाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याने बदनामीच्या भीतीने या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. हा प्रकार वाशिम जिल्ह्याच्या मंगरूळपीर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घडला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीला प्रतीक दिनकर डोंगरे या तरुणाने शाळेच्या बाथरूममध्ये बोलवले. त्याच वेळी दीपक महादेव वानखडे नावाच्या तरुणाने या दोघांचा व्हिडीओ बनवला आणि तो व्हायरल केला. या प्रकाराने बदनामी होईल या धास्तीपोटी या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

विद्यार्थिनीच्या वडिलांनी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद नोंदवली. या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रतीक आणि दीपक या दोघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच यापैकी एका आरोपीला अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या