
पॉर्न व्हिडीओ तयार करून ते वेबसाइटवर टाकल्याप्रकरणी एका मॉडेलला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली. तिने काही वर्षांपूर्वी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस तयार केले होते. पोलिसांना काही साइटची नावे समजली आहेत, ज्या साइटवरून पॉर्न व्हिडीओ अपलोड केले जात असायचे.
चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ तयार करून ते वेबसाइटवर अपलोड केले जात असल्याची माहिती प्रॉपर्टी सेलला मिळाली. त्या माहितीनंतर प्रॉपर्टी सेलच्या अधिकाऱ्याने मढ येथे छापा टाकला. घडल्याप्रकरणी प्रॉपर्टी सेलने पाच जणांना अटक केली. त्यात फोटोग्राफी, अभिनेते, ग्राफिक डिझायनर आणि लाइटमनचा समावेश आहे. त्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांना एका मॉडेलची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्या मॉडेलला अटक केली असून तिने काही जाहिराती, तेलगू आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. त्या मॉडेलने आतापर्यंत 87 पॉर्न व्हिडीओ साइटवर अपलोड केले आहेत. जे 200 ते 2000 रुपयांचे सबस्क्रिप्शन घेऊन ती साइट पाहतात अशानाच ते व्हिडीओ दिसतात. पॉर्न व्हिडीओप्रकरणी पोलिसांनी त्या मॉडेलला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. ते रॅकेट कोणत्या शहरात आणि कधीपासून सुरू आहे त्याचा तपास प्रॉपर्टी सेलचे अधिकारी करत आहेत.































































