कामगार विमा रुग्णालयांत आधुनिक सुविधा देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये (ईएसआय) आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या सहभागातून बैठक घेऊन सुधारणा करण्यात येतील, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले. ईएसआय रुग्णालयांमध्ये एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. 50 पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेल्या ईएसआय रुग्णालयांमध्ये सीटीस्पॅन व एमआरआयसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.