मुस्लीम महिलांना मिळणार न्याय, मन की बात मधून पंतप्रधान मोदींची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या रेडियो कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. कार्यक्रमात त्यांनी रक्षा बंधन आणि जन्माष्टमी च्या शुभेच्छा दिल्या. तसेच केरळ पूर, एशियाड गेम्स, फिट इंडिया सारख्या विषयांना हात घातल्या तसेच ट्रिपल तलाक प्रकरणी मुस्लीम महिलांना न्याय देण्याचा विश्वास व्यक्त केला.

मोदी म्हणाले की “तिहेरी तलाक वरील कायदा लोकसभेत पारित झाला आहे, तो राज्यसभेत अजून पारित झालेला नाही. मी मुस्लीम महिलांना मी आश्वासन देतो की संपूर्ण देश तुमच्या न्यायासाठी सज्ज आहे”  

केरळ पूर

केरळमधील भीषण पूराबद्दल मोदी म्हणाले की “केरळमध्ये पूरामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज या कठीणसमयी संपूर्ण देश केरळसोबत आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की पूर्ण निर्धाराने केरळ पुन्हा उठून उभा राहिल. कठोर परिश्रम करणार्‍या शेतकर्‍यांसाठी मानसून नव्या आशा घेऊन आला आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर मोठ्या प्रमाणात आव्हाने सोडून जातात पण या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात माणूसकी पाहायला मिळते.” संपूर्ण देश केरळसाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाजपेयींची आठवण

मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचीही आठवण काढली. मोदी म्हणाले “वाजपेयी गेल्यानंतर ज्या प्रमाणे संपूर्ण देश शोक सागरात बुडाला होत्या त्यावरून अटलजी किती आसामान्य व्यक्ती होते हे कळते” तसेच “२००१ आली वाजपेयी पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ संध्याकाळी ५ च्या ऐवजी सकाळी ११ केली होती. वाजपेयींनी समृद्ध आणि विकसित हिंदुस्थानचे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्याचा संकल्प करून सगळ्या देशवासीयांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.”