मोदी फादर ऑफ दी नेशन, ट्रम्प यांची स्तुतिसुमने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक महान नेते आहेत. तसेच एक सभ्य आणि चांगले व्यक्ती आहेत. हिंदुस्थानात सुरुवातीला वादावादीचे वातावरण होते, मात्र ही परिस्थिती मोदी यांनी खूपच उत्तम प्रकारे हाताळली. त्यांचा उल्लेख ‘फादर ऑफ दी नेशन’ असाच केला पाहिजे, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली.

पंतप्रधान मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

ट्रम्प म्हणतात…

  • आम्ही दोघे मिळून इस्लामिक दहशतवादाकिरोधात लढा देणार.
  • हिंदुस्थान आणि पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच त्यांचे अंतर्गत वाद सोडवू शकतात.
  • मोदी दहशतवादाचा मुद्दा सोडवतील, त्यांनी दहशतवादा विरोधात दिलेला संदेश पाकिस्तान जरूर ऐकेल अशी अपेक्षा आहे.

मोदींनीही ट्रम्प यांची स्तुती केली. ट्रम्प हे केकळ माझेच मित्र नाहीत, तर संपूर्ण हिंदुस्थाने मित्र आहेत. दोन देशांतील मैत्री आता आणखी घट्ट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.