
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा हे आपल्या पक्षावर टीका करण्यासाठी ओळखले जातात. गेल्या काही दिवसात त्यांनी स्वपक्षावर चौफेर टीका केली. अशातच भाजप आणि मोदींसोबत असलेल्या संबंधांवर सिन्हा यांना प्रश्न विचारण्यात आला.
… तर आज मी भाजप नाही काँग्रेसमध्ये असतो!
पंतप्रधान मोदींकडून तुम्ही काय चांगलं शिकलात असा प्रश्न सिन्हा यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी तात्काळ ‘उर्जा’ असे उत्तर दिले. पंतप्रधान मोदींकडून त्यांची उर्जा घेण्यासारखी आहे असे सिन्हा म्हणाले. तसेच आपल्या पौराणिक ग्रंथांनुसार रावणासह सर्वांकडून काही तरी शिकण्यासारखे असते असे नमूद करण्यात आल्याचे ते म्हणाले. तसेच पक्षासोबत असलेल्या संबंधांवर बोलताना सिन्हा म्हणाले की, आमचे संबंध कडू-गोड आहे.
सीबीआयला संपवलं
सीबीआय वादावर सिन्हा विरोधकांसोबत असल्याचे दिसून आले. सरकारने सीबीआयला संपवलं आहे. तसेच राफेल सारख्या प्रकारांना दडपण्यासाठी हे सुरू असावं असेही ते म्हणाले. तसेच राफेल प्रकरणावर मोदींनी आपले मौन सोडावे असेही ते म्हणाले.






























































