कृपया आपल्या देशाचं नाव बदला; स्वातंत्र्यदिनी स्टार क्रिकेटपटूच्या पत्नीचं पंतप्रधान, गृहमंत्र्यांना साकडं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. ब्रिटीशांच्या गुलामीच्या जोखडातून मुक्त होऊन हिंदुस्थानला आज 75 वर्ष पूर्ण झाली. देशभर घरोघरी तिरंगा मोहीम राबवण्यात येत असल्याने अवघा देश तिरंगामय झाला आहे. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूच्या पत्नीने एक अजब मागणी केली आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने देशाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. हसीनने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच साकडे घातले आहे. या संदर्भात तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला शेअर केलेल्या या व्हिडीओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये तिने देशाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे.

”आपला देश, आपला सन्मान. आय लव्ह भारत. आपल्या देशाचे नाव फक्त हिंदुस्थान किंवा भारत असायला हवे, असे हसीनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना साकडे घालत ‘इंडिया’ हे नाव बदलून संपूर्ण जगाने आपल्याला फक्त भारत किंवा हिंदुस्थान या नावाने ओळखायला हवे”, असेही तिने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial)

दरम्यान, मोहम्मद शमी आणि हसीन जहां हे गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे रहात आहेत. 2018 मध्ये दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. हसीनने शमीवर मारहाण, घरगुती हिंसाचारचा आरोप लगावला होता. तसेच त्याच्या भावावरही गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून दोघे वेगळे रहात आहेत.