जमीन, नोकऱ्या जाणार ही कश्मिरींची भीती अनाठायी- मोहन भागवत

295

कश्मीरमधून 370 कलम हटवल्यामुळे स्थानिकांची जमीन, नोकऱ्या हिरावल्या जाणार असल्याची भीती अनाठायी आहे. उलट हे कलम हटवल्यामुळे आता कश्मिरी आणि इतर देशवासीय एकरूप झाले आहेत. त्यामुळे कश्मिरी मुख्य प्रवाहात येतील, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

भागवत यांनी मंगळवारी परदेशी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय नागरिक नोंदणीबद्दल (एनआरसी) बोलताना ते म्हणाले, ‘एनआरसीची अंमलबजावणी लोकांना देशातून हाकलवून लावण्यासाठी नाही तर नागरिकांना ओळखण्यासाठी आहे.

पत्रकार हतबल झाले आहेत!
कश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पत्रकार अक्षरशः हतबल झाले आहेत. पत्रकारांना तळागाळात काय चालले आहे, याचा पत्ता लागत नाहीय. कश्मिरी प्रसारमाध्यमांवर कारण नसताना निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे हे निर्बंध उठवावेत, अशी मागणी कश्मीर प्रेस क्लबने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या