
आरएसएस कोणत्याही समाजाचा द्वेष करीत नाही. हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. त्यामुळेच सर्व धर्म इथे सुरक्षित आहेत. यात पारसी, यहुदीसुद्धा आहेत. किंबहुना, हिंदुस्थानातील मुस्लिम हे जगात सर्वात जास्त सुखी आहेत, असा दावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला. आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते.
ओवेसी भडकले
सरसंघचालकांनी हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे असे सांगिल्याने एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी भडकले आहेत. हे हिंदू राष्ट्र कधीच नव्हते. भागवत इतिहास बदलू शकत नाहीत, असे ओवेसी म्हणाले.

























































