विदर्भात मॉन्सून गुरुवारी धडकणार; तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

नागपूरसह संपूर्ण विदर्भातील हवामान मॉन्सूनच्या आगमनासाठी अनुकूल असून गुरुवारी मॉन्सून विदर्भात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागपूरच्या प्रादेशक हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाबाबत ही माहिती दिली आहे.

राज्यातही मॉन्सून योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याने नागपूरसह संपूर्ण विदर्भात तीन दिवस 11,12,आणि 13 जून रोजी मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मॉन्सूनची महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे घोडदौड सुरू असून 15 जूनपर्यंत टप्प्याटप्प्याने विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. विदर्भात यंदा पाऊस सामान्य राहणार असून 15 जूनपर्यंत विदर्भात सर्व ठिकाणी मॉन्सून दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या