
संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा घालवणाऱ्या पावसाने सप्टेंबरमध्येही बळीराजाची घोर निराशा केली. गणेशोत्सवात राज्यभरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र पुन्हा पावसाने लपंडाव सुरू करून शेतीला संकटात टाकले. आता दुबार पेरणी केलेल्या शेतकऱयांना पुन्हा पावसाची आशा असतानाच ऑक्टोबरच्या मध्यावर संपूर्ण राज्यभरातून मान्सून काढता पाय घेईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता आणखी वाढणार असून ऐन सणासुदीला दसरा, दिवाळीत महागाईची पह्डणी बसण्याची शक्यता आहे.
– पुढचे दोन दिवस विदर्भ, मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज मुंबईच्या हवामान विभागाच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी व्यक्त केला आहे.
– येत्या सहा ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात सर्वच ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस राहील तर अनेक भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहील.


























































