
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय. हवामान खात्याकडून पुढील चार आठवड्यांत देशभरात मान्सूनची स्थिती काय असेल याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मान्सूनचे आगमन संपूर्ण देशात खूप आशादायक असेल असे म्हणत येणाऱ्या मान्सूनच्या शुभेच्छा पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत दिल्या आहेत.
22 May, येत्या ४ आठवड्यांसाठी (२२ मे ते १९ जून) संपूर्ण भारतात पावसाचा विस्तारित कालावधीचा अंदाज आज आयएमडीने वर्तवला आहे.
संपूर्ण देशात मान्सूनच्या आगमन आणि त्याच्या वितरणासाठी खूप आशादायक दिसत आहे.
येणाऱ्या मान्सूनच्या शुभेच्छा व सर्वांना तो फलदायी ठरो. pic.twitter.com/cNMaJbQjQB— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 22, 2025
पुढील चार आठवडे कसा असेल मान्सून?
पहिला आठवडा 22 मे ते 29 मे – पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर जास्त पावसाची शक्यता आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य भारत, पूर्व भारत आणि उत्तर प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसरा आठवडा 29 मे ते 5 जून – पश्चिम किनारपट्टी आणि उत्तर किनारपट्टीवर जास्त सकारात्मक पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू आणि एसआयके वगळता भारतातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.
तिसरा आठवडा 5 जून ते 12 जून – मध्य भारत, पूर्व भारत, उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर केरळ आणि एसआयकेमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चौथा आठवडा 12 जून ते 19 जून – महाराष्ट्र, एनआयके, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, जीडब्ल्यूबी, बिहार, उत्तर प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.