
गारेगार आईस्क्रीम म्हटलं की भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळय़ात तर आईस्क्रीम हवंच. साधारण 5-10 रुपयांपासून त्यांची किंमत असते. पण सध्या एक आईस्क्रीम चर्चेत आलंय, ज्याची किंमत ऐकून थक्क व्हाल. तब्बत पाच लाख रुपयांचे हे आईस्क्रीम आहे.
जपानमधील आईस्क्रीम बनवणाऱया सिलाटो पंपनीने हे प्रोडक्ट लाँच केलेय. ब्याकुया असे आईस्क्रीमचे नाव असून ते जगातील सर्वात महागडे ठरले आहे. ते प्रोटीनयुक्त असून त्यात दुधाचा बेस आहे. त्यात वेगवेगळय़ा प्रकारचे चीज, अंडय़ाचा बलक, पॅर्मियानो चीज, व्हाइट टुफल ऑईल, गोल्ड लीफ असते. ते स्टायलिश ब्लॅकबॉक्समध्ये दिले जाते. सोबत खास हाताने बनवलेला धातूचा चमचा असतो. या चमच्यामुळेच आईस्क्रीमची किंमत जास्त असल्याचा अंदाज आहे. पंपनीच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, 130 मिमी ब्याकुआ आईस्क्रीमची किंमत 6700 डॉलर एवढी आहे.



























































