
सामना ऑनलाईन । मुंबई
1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 अशा सलगच्या सहा विश्वचषकांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनच्या नावावर शेकडो विक्रम जमा आहेत. यातील काही विक्रम तोडणे नजिकच्या काळामध्ये अशक्य वाटत आहेत. यापैकीच एक म्हणजे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम.
सचिन तेंडुलकरने सहा वर्ल्डकपमध्ये 44 डावांमध्ये फलंदाजी करताना 56.95 च्या दणदणीत 2278 धावा चोपल्या आहेत. याच सचिनच्या 6 शतकी आणि 15 अर्धशकीय खेळींचा समावेश आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सचिनचा हा विक्रम मोडणे अशक्य वाटत आहे. कारण यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या न्यूझीलंडचा मार्टीन गप्टिल फक्त सचिनच्या मागावर परंतु कोसो दूर आहे. गप्टिलच्या नावावर दोन वर्ल्डकपमध्ये मिळून 809 धावा जमा आहेत. कदाचित आगामी विश्वचषकामध्ये गप्टिल दिसणारही नाही. त्यामुळे सचिनचा हा विक्रम कायमच अबाधित राहणार अशीच शक्यता आहे.





























































