न्याडोली डेंग या तरूणीला सोशल मीडियावर मिळाले 2023 मधील सर्वाधिक व्ह्यूस… वाचा सविस्तर

सोशल मीडियावर मेकअपचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा त्वचा गोरी कशी करावी यासाठी मार्गदर्शनपर व्हिडीओ दाखवल्या जातात. अलिकडे आधी आणि नंतर या आशयाचे व्यक्तिचा कायापालट करणारे व्हिडीओचे प्रमाण वाढले आहेत. या व्हिडीओमध्ये त्या मुलींना ओळखणे देखील कठीण जाते. गेल्या काही वर्षांपासून सगळे रंग सारखे व सुंदर असल्याच्या भावनेला महत्व दिले जात आहे. अलिकडे बाजारात भौगोलिक परिस्थितीनुसार मेकअप प्रोडक्स देखील मिळतात.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. TikTok या समाज माध्यमावर एक व्हिडीओ सर्वाधिक वेळा पाहिला गेलाय. टिकटॉकने दिलेल्या अहवालानुसार न्याडोली डेंग या तरूणीच्या मेकअप ट्युटोरियलला सर्वाधिक व्ह्यूस मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. न्याडोलीने मार्च महिन्यात व्हिडीओ अपलोड केला होता. मार्च पासून आत्तापर्यंत या व्हिडीओला 504 दशलक्षाहून अधिक व्ह्यूस मिळाले आहेत.

न्याडोलीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरही अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये मेकअपसाठी ती विविध उत्पादने वापरताना दिसत आहे. नेटिझन्सनी कमेंट सेक्शनमध्ये तिला ब्लॅक ब्यूटी असेही म्हटले आहे. तर काहींनी देवाने तिला सर्वात सुंदर रंग दिला असल्याचे म्हटले आहे.