किश्तवाडमध्ये ’जैश’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड सैफुल्ला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मिरच्या किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या भीषण चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवादी ज्या ठिकाणी लपले होते, ते ठिकाण ग्रेनेड स्पह्टाद्वारे उडवून देण्यात आले. या चकमकीत सैफुल्ला हा ठार झाला आहे. या ठिकाणी अजूनही चकमक सुरूच असून आणखी दहशतवादी परिसरात लपल्याची माहिती आहे.

सुरक्षा दलांनी दिलेल्या माहितीनुसार, चतरु या परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार परिसरात मोठी शोधमोहीम राबवण्यात आली. त्या दरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. दहशतवादी एका बंकर मध्ये लपले होते. ती जागा एका झोपडीवजा बांधकामाने लपवली होती. सुरक्षा दलांनी तेथे ग्रेनेड टापून पूर्ण जागाच उद्ध्वस्त करून टाकली. त्या ठिकाणी 3 दहशतवादी ठार झाले. त्यात हा ठार झाला. सैफुल्ला हा गेल्या 2 वर्षांपासून या परिसरात सक्रिय होता. अनेक वेळा त्याने सुरक्षा दलांना हुलकावणी दिली होती. त्याचा खात्मा हे सुरक्षा दलाचे मोठे यश मानले जात आहे. इतर दोघांची ओळख पटविण्यात येत आहे. घटनास्थळावरून रायफल तसेच मोठया प्रमाणावर इतर रसद जप्त करण्यात अली आहे.

या मोहिमेत हिंदुस्थानी सैन्याच्या श्वान पथकातील ख्9 टायसन श्वान पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. दहशतवादी लपले होते, त्या ठिकाणी तोच सर्वप्रथम पोहोचला होता.

सुरक्षा दलांचे ऑपरेशन ’किया’

चतरु भागात 4 फेब्रुवारी रोजी सुरक्षा दलालांनी जैशच्या एका दहशतवाद्याला ठार केले होते. त्यानंतर उधमपूर जिह्यात देखील एका गुहेत लपलेल्या जैशच्या 2 दशतवाद्यांना ग्रेनेड स्फोटात ठार करण्यात आले होते. ही कारवाई ऑपरेशन ’किया’ अंतर्गत करण्यात येत आहे.