शेवटी आई ती आईच असते! मुलीसाठी टिश्यू पेपरपासून बनवला गजरा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आई ती आईच असते, तिची तुलना जगात कु-णाशीही करता येत नाही. आपल्या मुलांच्या चेहऱयावर हसू फुलविण्यासाठी आई काहीही करू शकते. सोशल मीडियावर सध्या अशाच एका मायलेकाRची चर्चा आहे. आपल्या मुलीसाठी या आईने चक्क टिश्यू पेपरपासून गजरा तयार केलाय. हा गजरा पाहिल्यावर तो टिश्यू पेपरपासून नक्हे तर खरोखरच्या फुलांपासून तयार केलेला गजरा वाटतोय. ’आईनं माझ्यासाठी टिश्यू पेपरपासून तयार केलेला गजरा’ असं क@प्शन देत सुरेखा पिल्लई या ट्विटर युजरनं आपल्या अकाऊंटवर या गजऱयाचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. हा गजरा केसांमध्ये माळून त्याचा क्हिडीओही पोस्ट केला आहे. ‘मी केसांमध्ये घातलेल्या इतर फुलांपेक्षा माझ्या आईने तयार केलेला गजऱयाचा खूपच सुंदर सुवास येत आहे. माझ्या आईनं सांधेदुखीचा त्रास होत असतानासुद्धा तासन् तास बसून माझ्यासाठी हा गजरा तयार केलाय.’ असंही सुरेखा पिल्लई यांनी म्हटलंय. आईचा जादुई स्पर्श, आईनं निर्जीव गोष्टीतही जिवंतपणा आणला अशी कमेंट एका युजरने त्यावर दिली आहे.