जियो सिनेमा हा मनोरंजनाचा एक खजिनाच आहे. आणि या खजिन्या आणखी एका रत्नाचा समावेश होणार आहे. जियो सिनेमावर लवकरच Moving Mountains Within ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना श्वास रोखून पहावी लागेल अशी ही डॉक्युमेंट्री आहे.
JioCinema Premium, भारताचे प्रमुख मनोरंजन गंतव्यस्थान, 7 ऑगस्ट रोजी एक आकर्षक डॉक्युमेंटरी ‘Moving Mountains Within’ रिलीज करण्याची घोषणा केली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये धाडसी आणि उत्साही धावकांच्या एका गटाचे चित्रण केले आहे, ज्यांनी भारतातील लडाखमध्ये झालेल्या La Ultra – The High च्या 10 व्या आवृत्तीत मानवाच्या क्षमता चाचणीत घेतलेल्या अनुभवांचे प्रदर्शन केले आहे.
काही वाळवंटी भागात सामान्य माणसाला श्वास घेणं अशक्य होतं. उंचावर गेल्यास नानाविध आराज होतात. अशा ठिकाणी काही साहसी खेळाडू 555 किमीच्या ट्रेकचा प्रवास अवघ्या 132 तासांत पूर्ण करतात.
लडाखचे ते अद्भुत पठार आणि अस्थिर हवामान, जे उणे 10 अंश सेल्सियस ते ते 40अंश सेल्सियस पर्यंत झपाट्याने बदलतं. ऑक्सिजन सिलेंडरशिवाय जीवघेण्या इथे श्वास घेणं अशक्य होतं. अशा भयंकर संकटाचा सामना हे खेळाडू करतात. शारीरिकच नव्हे तर मानसिकरित्या देखील पराभूत झाल्यावर पुन्हा उभे राहणाची कामगिरी हे खेळाडू करतात. या डॉक्युमेंटरीमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश आहे. त्यात अमेरिकेतील उद्योजक दांपत्य – मॅथ्यू आणि कॅसी, आशिष कसोडेकर ज्यांनी पूर्वी La Ultra 2018 इव्हेंटमध्ये 333 किमी पूर्ण केले होते. ही डॉक्युमेंट्री 7 ऑगस्टला जियो सिनेमावर प्रमियर होणार आहे.