‘उलटे टांगेन’ भाजप खासदाराची कंत्राटदाराला धमकी

मध्य प्रदेशात भाजप खासदाराने व्यासपीठावरून कंत्राटदाराला धमकी दिली आहे. कंत्राटदाराला धमकी देतानाचा त्यांचा व्हीडिओ व्हायरल होत असून त्याची सध्या चर्चा होत आहे. या घटनेने खासदाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशातील रतलामचे भाजप खासदार गुमान सिंह डामोर सध्या एका व्हीडिओमुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी व्यासपीठावरून एका कंत्राटदाराला ‘उलटे टांगेन’ अशी धमकी दिली आहे. कंत्राटदाराला धमकी देतानाचा त्यांचा व्हीडिओ व्हायरल होत असून त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

व्हायरल झालेला हा व्हीडिओ 18 नोव्हेंबरचा आहे. तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झाबुआ जिल्ह्यातील पेटलावदमध्ये नगर परिषदेच्या एका कार्यक्रमासाठी डामोर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी नगर परिषदेच्या अध्यक्षांनी रस्त्यांच्या कामात विलंब करणाऱ्या कंत्राटदारांची तक्रार केली. त्याची दखल घेत डामोर यांनी व्यासपीठावरूनच कंत्राटदाराला फटकारले. तसेच ”निर्धारीत वेळेत काम पूर्ण झाले नाही, तर उलटे टांगेन” अशी धमकीही दिली. खासदार डामोर यांनी कंत्राटदाराला धमकी दिल्यावर नगर परिषदेच्या अध्यक्ष खूश झाले त्यांनी जोरदार टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले.

कत्रांटदाराला धमकी दिल्याने डामोर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. आपण कंत्राटदाराला उलटे टांगण्याची धमकी दिल्याचे डामोर यांनी मान्य केले आहे. कंत्राटदार राजकीय आकसातून रस्त्याच्या कामाला विलंब करत आहे. त्याचा जनतेला त्रास होत असल्याने धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. जनतेचा त्रास दूर करण्यासाठीच कंत्राटदाराला धमकावल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या