खासदार ओवैसी यांनी घेतली तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट, राज्यात NPR लागू न करण्याची केली विनंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. केरळ प्रमाणे तेलंगाणातही राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी लागू करू नये अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. ओवैसी यांच्यासोबत मुस्लिम संघटनेचे काही प्रतिनिधीही उपस्थित होते.


देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि NRC ला विरोध होत आहे. NRP ही NRC चीच आवृत्ती असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. म्हणून केरळ आणि पश्चिम बंगाल सरकारने राज्यात NRP लागू न करण्याची भुमिका घेतली आहे. तेलंगाणातही NRP लागू करू नये म्हणून ओवैसी यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. ही भेट सकारात्मक झाल्याचे ओवैसी यांनी सांगितले. या मुद्द्यावर दोन दिवसात ते उत्तर देतील असेही ओवैसी यांनी सांगितले.