
सामना प्रतिनिधी । परळी
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त परळीच्या गोपीनाथ गडावर मुंडे भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनीही गोपिनाथ गडावर हजेरी लावली आणि समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मुंडे-विखे कुटुंबीयाचे ऋणानुबंध जुने आहेत, अशी प्रतिक्रिया दिली.
‘पंकजा मुंडे यांनी केलेले प्रचार खूप महत्वाचा ठरला. यामुळे मला विजयासाठी मोठी मदत झाली असे डॉ.सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले. लोकसभेसाठी पाथर्डीतून मला मोठी लीड भेटली. मुंडे-विखे पाटील कुटुंबियाचे ऋणानुबंध जुने. बीड नगरचा खासदार आम्ही दोन्ही कुटूंब मिळवून ठरवायचो’, असे सुजय विखे यावेळी म्हणाले.
























































