फाल्कन्स आणि बॅशर्स संघांमध्ये सलामीची लढत, एमपीएल लीग टेबल टेनिस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डीसीबी बँक-एमपीएल लीग टेबल टेनिस स्पर्धेतील पहिल्या गट-अ लीग सामन्यात शुक्रवारी (16 जून) रीगन अल्बुकर्क आणि मानुषी पाटील यांच्या नेतृत्वाखालील थंडर फाल्कन्सचा सामना चिन्मय सोमय्या आणि सेनहोरा डिसोझा यांच्या नेतृत्वाखालील सेंच्युरी बॅशर्स संघाशी होईल.

सबर्बन टेबल टेनिस असोसिएशन (टीएसटीटीए, मुंबई) आणि मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या (एमसीडीटीटीए) संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले येथे रंगणाऱया स्पर्धेतील याच गटातील दुसऱया सामन्यात जश मोदी, अनन्या चांदे आणि हार्डी पटेल यांचा समावेश असलेल्या पीटीकेएस अचिव्हर्सची गाठ सागर कस्तुरे, अनन्या बसाक आणि शर्वेया सामंत यांच्या मुंबई रॉयल्सशी पडेल. ग्रुप-बीमध्ये पिंग-पॉन्ग नाइट्स विरुद्ध अंडरडॉग्स तसेच पिंग पँथर्स विरुद्ध सुपर टायटन्स अशा लढती रंगतील.

प्रमुख पाहुणे परमवीरचक्र विजेते कॅप्टन योगेंद्र सिंग यादव, अभिनेते शिवाजी साटम तसेच टीएसटीटीएचे अध्यक्ष तसेच प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आणि एमपीएलचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. सहभागी 8 फ्रेंचायझी संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून सुरुवातीला ते राऊंड रॉबिन लीगमध्ये खेळतील. प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

गटवारी – अ गट : ः सेंच्युरी बॅशर्स, मुंबई रॉयल्स, थंडर फाल्कन्स, पीटीकेएस अचिव्हर्स.
ब गट : पिंग-पॉन्ग नाइट्स, पिंग पँथर्स, अंडरडॉग्स, सुपर टायटन्स.