एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले, सोनाली म्हात्रे, विशाल यादव राज्यात अव्वल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) मे 2022 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

या परीक्षेमध्ये सर्वसाधारण उमेदवारांमधून प्रमोद चौगुले, महिलांमधून सोनाली म्हात्रे आणि मागासवर्ग उमेदवारांमधून विशाल यादव हे राज्यात प्रथम आले आहेत. 405 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत अशी माहिती एमपीएससीने दिली आहे. त्यासंदर्भातील सूचना आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.