अंबरनाथच्या तरुणीला वाटतेय ट्रेन प्रवासाची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

ट्रेनचा प्रवास करणं म्हणजे खरंतर मुंबईकरांसाठी रोजच्या जगण्यातली एक अविभाज्य गोष्ट. पण, अंबरनाथमधली एक तरुणी मात्र दिवसाही ट्रेनचा प्रवास एकटीने करू शकत नाही. कारण, एका चोराने तिला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे तिला आता एकटीने प्रवास करण्याची भीती वाटत आहे.

शुक्रवारी ही तरुणी रेल्वेतून प्रवास करत असताना एका तरुणाने तिला चाकूचा धाक दाखवून लुटलं होतं. त्यानंतर त्या तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून ती भीतीच्या छायेत वावरत आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला, मात्र तिची भीती कमी झालेली नाही. तरुणीचे वडील नोकरी करत असून आई गृहिणी आहे. त्यामुळे तिच्यासोबत रोजचा प्रवास करणं या दोघांनाही शक्य नाही. त्यामुळे या तरुणीला पुढील काही दिवस महाविद्यालयात न पाठवण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. तसंच दिवसाढवळ्या होणारे हे गैरप्रकार रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांची गस्त वाढ

या प्रकरणी पोलिसांनी सोहेल अन्सारी (२०) या तरुणाला अटक केली आहे. मुंब्र्यातील अमृत नगर येथे राहणाऱ्या सोहेलनेच धाक दाखवून या तरुणीला लुटलं होतं. सध्या सोहेल पोलीस कोठडीत असून त्याने यापूर्वीही अशी कृत्य केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

summary- mugged girl fears to board in train