मिनीटाची कमाई 23 लाख, कुबेराएवढी संपत्ती; जग ‘मुठीत’ करणारा उद्योगपती…

रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांच्याबद्दल असे म्हणतात की, एखादी व्यक्ती चहाचा कप संपवण्यासाठी जितका वेळ घेते, तितक्याच वेळात त्यांची संपत्ती लाखोंच्या संख्येने वाढते. आज आम्ही तुम्हाला मुकेश अंबानीशी संबंधित काही विशेष माहिती सांगणार आहोत.

मुकेश अंबानी हे हिंदुस्थानासह संपूर्ण आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या 10 वर्षात त्यांची संपत्ती सुमारे 3 पटींनी वाढली आहे. 2010 मध्ये त्यांची संपत्ती 27 अब्ज डॉलर्स इतकी होती. 2020 मध्ये यात वाढ होऊन त्यांची संपत्ती आता 80 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. मुकेश अंबानी यांचे कुटुंब मुंबईतील 27 मजली असलेल्या ‘अँटिलिया’ येथे राहते. अँटिलिया ही इमारत बनवण्यसाठी सुमारे 7 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. हे घर जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान घरांमध्ये मोजले जाते.

maxresdefault

मुकेश अंबानी हिंदुस्थानातील दुसर्‍या सर्वात श्रीमंत व्यक्तीपेक्षा 4 पटीने अधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. राधा किशन दमानी हे हिंदुस्थानातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. राधा किशन दमानी यांची अंदाजे मालमत्ता सुमारे 17.8 अब्ज डॉलर्स इतकी आहे. मुकेश अंबानींच्या संपत्तीचे विश्लेषण केले असता असे समजते की, ते दर मिनिटाला 23 लाख रुपयांहून अधिकची कमाई करतात. वर्ष 2019 मध्ये मुकेश अंबानी यांची संपत्ती दररोज 33 कोटींपेक्षा अधिक रुपयांनी वाढली आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, अफगाणिस्तान, बोतस्वाना आणि बोस्नियासारख्या देशांची एकूण जीडीपी जोडली गेली तरी ती मुकेश अंबानींच्या संपत्तीपेक्षा कमी असेल.

आपली प्रतिक्रिया द्या