
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
काही ठोस कारण नसताना अधिवेशनाचा कालावधी का वाढवला जातोय… अहो, लोकांना लग्नालाही जाता येत नाही, असा मुद्दा समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत उठवला तेव्हा सर्व सभागृह थक्क झाले. अधिवेशन वाढवण्यामागे नक्कीच सरकारचे कारस्थान आहे, असा आरोप यादव यांनी केला. काँग्रेसच्या खासदारांनी तसेच तृणमूल काँग्रेसच्या सौगत राय यांनीही यादव यांचे समर्थन केले. गेल्या 17 जून रोजी नव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले होते. 26 जुलैला ते संपणार होते; पण बरेच कामकाज बाकी असल्याचे कारण देत सरकारने कालावधी 7 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे.
























































