
मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या घटत असून आज दिवसभरात 659 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात सापडलेल्या 659 रुग्णांपैकी 619 जणांना कोणतीही लक्षणे आढळली नाहीत तर 40 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 7 जणांना ऑक्सिजनची बेडची गरज लागली.
दिवसभरात 1 हजार 289 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 6 हजार 409 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आज दिवसभरात 3 हजार 98 कोरोना रुग्ण सापडले तर 6 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 4 हजार 207 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन ती 20 हजार 820 वर पोहोचली आहे.



























































