‘त्या’ सीनवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बापट म्हणते…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मुंबई

‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसीरीजमधील एका दृश्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गल्लीबोळापासून ते अगदी ऑफिसपर्यंत सगळ्यांच्या तोंडात फक्त प्रिया बापटचेच नाव आहे. या वेबसीरीजमध्ये प्रियाने महिलेसोबत केलेले प्रणय दृश्य अनेकांना खटकले आहेत. प्रियासारख्या मराठमोळ्या अभिनेत्रीने असे अश्लील दृश्य दिल्याने तिचे चाहते नाराज झाले आहेत. यावरून तिला ट्रोलही करण्यात येत आहे. पण हाडाची कलाकार असलेल्या प्रियाने ‘एका क्लिपवरून कोणाच्याही चारित्र्याबद्दल मत ठरवू नका’ असे थेट उत्तर देत ट्रोलर्सला गप्प केलं आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रियाला त्या दृश्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी बोलताना तिने ”त्या दृश्याबद्दल बोलणाऱ्यांची दया येते” असे म्हटले आहे. तसेच ”सिटी ऑफ ड्रीम्स ही 10 तासांची वेबसीरीज असून त्याचे 8 एपिसोड आहेत. ते आधी बघा. ते दृश्य का आहे? कशासाठी आहे? हे आधी बघा असे प्रियाने सांगितले आहे. तसेच या दृश्याची क्लिप व्हायरल झाल्याने त्या एका क्लिपवरून माणसांच्या चारित्र्याबद्दल अनुमान लावू नका”, असेही प्रियाने म्हटले आहे.