मुंबईकरांसाठी 12 मार्गांवर ‘बेस्ट’चा गारेगार प्रवास सुरू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील विविध 12 मार्गांवर आता ‘बेस्ट’च्या तब्बल 55 ‘मिनी-मिडी’ एसी बसचा वेगवान प्रवास सुरू झाला आहे. या गाडय़ा आकाराने लहान असल्यामुळे प्रवासाचा वेळही वाचत आहे. दरम्यान, आगामी सहा महिन्यांत ‘बेस्ट’च्या ताफ्यात तब्बल दोन हजार ‘मिनी-मिडी’ एसी बस दाखल होणार आहेत.

पालिकेकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर ‘रुळा’वर येत असलेल्या ‘बेस्ट’ने मुंबईकरांना यापुढे जास्तीत जास्त प्रवास गारेगार आणि वेगवान करण्यावर भर दिला आहे. यामध्ये बसभाडे कमी केल्यानंतर दररोजच्या प्रवाशांची संख्या अठरा लाखांवरून 23 लाखांवर पोहचली आहे. दरम्यान, प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी नव्या गाडय़ा ‘एसी’ असलेल्याच आणल्या जाणार आहेत. सध्या आणलेल्या एसी गाडय़ा खासगी तत्त्वावर आणल्या गेल्या आहेत. या मिनी वातानुकूलित बस 12 बसमार्गांकरून सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘ए 54 क ए 55 – कोहिनूर पीपीएलमार्गे  सिद्धिविनायक मंदिर’, ‘ए 122 बॅलार्ड पियर ते चर्चगेट स्थानक’,  ‘ए 167 प्रभादेवी स्थानक ते कॉम्रेड प्र. कृ. कुरणे चौक वरळी’, ‘ए 352-राणी लक्ष्मीबाई चौक शीव ते ट्रॉम्बे’ या दरम्यान सुरू केल्या आहेत. तसेच अंधेरी स्थानक पश्चिम येथून ‘ए 221 – जुहू विलेपार्ले बसस्थानक’, ‘ए 235 क ए 242 मॉन्जिनीस केक शॉप’, ‘ए 249 क ए 251’  सात बंगला बसस्थानक, ‘ए – 248 रमेश नगर’ क ‘ए – 254 वीरा देसाई मार्गासाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

सध्याची स्थिती

बसचे सुमारे मार्ग – 400

सध्या ‘बेस्ट’च्या ताफ्यात स्वतःच्या 3100 गाडय़ा

येत्या सहा महिन्यांत दोन हजार एसी बस आणणार

 आगामी काळात एकूण गाडय़ांची संख्या 10 हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट

सध्या प्रदूषण रोखणाऱया स्वतःच्या मालकीच्या 7 आणि कंत्राटदाराच्या माध्यमातून 15 बस इलेक्ट्रिक चालवण्यात येत आहेत.