मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड साजिद मीरला अटक, पाकिस्तानने केला होता मृत्यू झाल्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी साजिद मीर याला पाकिस्तानात जिवंत अटक करण्यात आली आहे. एफबीआयने साजिद मीरवर 5 मिलियन डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानने यापूर्वीच साजिद मीरचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीरला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणात देण्यात आली आहे.

एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत साजिद मीरचा समावेश आहे. पाकिस्तानने नेहमीच साजिद मीर जिवंत असल्याचे नाकारले आहे. त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला होता. साजिदला ताब्यात घेऊन पाकिस्तानला दहशतवादाचा डाग पुसायचा आहे, असे बोलले जात आहे.

अमेरिकन एजन्सी एफबीआयने साजिद मीरवर पाच लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. जवळपास एक दशक अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश त्याला शोधत आहेत. साजिद मीर हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सुत्रधार आहे. या हल्ल्यात सुमारे 170 लोक मारले गेले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय, अमेरिकन आणि जपानसह अनेक ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश होता.

एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, साजिद मीर पाकिस्तानमध्ये जिवंत आहे, कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे. मीरच्या अटकेबाबत पाकिस्तानने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. उपपरराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी या प्रकरणात भाष्य करणार नसल्याचे सांगितले.