
दिल्लीत एका महिला वृत्तनिवेदिकेवर एका व्यक्तीने बलात्कार केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी ओळखीचे आहेत. 30 जानेवारी रोजी आरोपीने पीडित महिलेला आपण दिल्लीत आल्याचे सांगितले. तेव्हा आपण भेटू असे तिला कळवले. तेव्हा पीडित महिलेने त्याला होकार कळवला
25 फेब्रुवारी रोजी आरोपीने महिलेला मेसेज करून सांगितले की आपण माझ्या मित्राच्या घरी भेटूया आणि नंतर खाण्यासाठी खान मार्केटमध्ये जाऊया. महिलेने मित्राच्या घरी येण्यास नकार दिला. पण खान मार्केटमध्ये भेटण्यास होकार दिला. तेव्हा दोघेही ठरल्याप्रमाणे खान मार्केटमध्ये गेले आणि खाऊन झाल्यानंतर आरोपीने तिला हॉटेलवर बोलवले जिथे त्याचे कुटुंबीय असल्याचे सांगितले. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचे महिलेने म्हटले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.




























































