मुंबईत बेस्टच्या धावत्या बसला आग लागली आहे. सांताक्रुझ बस आगाराची ही बस असून आग लावली तेव्हा बसमध्ये 15 ते 20 प्रवासी होते. मात्र अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने प्रवासांचा जीव वाचला.
सांताक्रुझ बस आगारातील बस शनिवारी सकाळी 8.20 च्या सुमारास इलेक्ट्रिक हाऊस येथून सांताक्रुझ बस आगाराच्या दिशेने जात होती. रुट नंबर सी – 1, बस नंबर 7891 ही बस नागपाडा जे.जे रुग्णालय नागपाडा जवळ पोहोचताच बसने पेट घेतला. यावेळी बसमध्ये सुमारे 15 ते 20 प्रवासी प्रवास करत होते.
अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच वेळीच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने प्रवासी थोडक्यात बचावले आणि मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून अग्निशमन दलाचे अधिकारी स्थानिक पोलीस व बेस्ट उपक्रमाचे अधिकारी पुढील तपास करत असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
Mumbai BEST bus fire – नागपाडा येथे धावत्या बसला आग, 15 ते 20 प्रवासी थोडक्यात बचावले pic.twitter.com/iiYuubZRpt
— Saamana (@SaamanaOnline) December 9, 2023
सांताक्रुझ बस आगारातील बस रुट नंबर सी 1, बस नंबर 7891 ही बस सांताक्रुझ बस आगार ते इलेक्ट्रिक हाऊस दरम्यान धावते. शनिवारी सकाळी इलेक्ट्रिक हाऊस येथून निघालेली ही बस जे.जे. रुग्णालय नागपाडा जवळ पोहोचताच बसने पेट घेतला. बसला आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काय झाले हे स्पष्ट होण्याआधीच प्रवाशांनी मागच्या दरवाजाने बाहेर निघाले.
मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, बसच्या पुढच्या बाजुच्या टारयने पेट घेतला. या घटनेची चौकशी सुरु असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले