मुंबई मनपा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार – आशीष शेलार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवेल, कोणत्याही पक्षासोबत युती अगर आघाडी करण्याचा प्रश्नच नाही, असे भाजपचे आमदार अॅड. आशीष शेलार यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तरचे भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी शेलार कोल्हापुरात आले होते, यावेळी ते बोलत होते.

मुंबई महापालिकेत भाजप युती करणार असल्याची चर्चा खोटी असून, भाजप कोणत्याही पक्षाबरोबर युती वा आघाडी करणार नाही. स्वबळावर लढून महापालिकेवर सत्ता आणू, असा दावा शेलार यांनी केला.

कोल्हापुरात आलेले रोहित पवार, प्रणिती शिंदे, धीरज देशमुख यांच्यासह युवा आमदारांनी स्थानिक प्रश्नावर बोलणे अपेक्षित होते. मात्र, ते केंद्रातील प्रश्नावर बोलले, असेही शेलार म्हणाले.