सामना ऑनलाईन । मुंबई
शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी निघालेल्या तीनपैकी एक बोट बुधवारी दुपारी गिरगाव जवळ अरबी समुद्रात बुडाली. या बोट अपघातात बेपत्ता झालेल्या सिद्धेश पवारचा मृतदेह सापडला आहे. सिद्धेश हा स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचा कार्यकर्ता होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. सिद्धेश हा चार्टर्ड अकाउंटंट होता.
#UPDATE: Police confirmed that there were 25 people on board the capsized boat. 24 were evacuated safely earlier; one body recovered by State Control Room: Indian Coast Guard PRO
— ANI (@ANI) October 24, 2018
बुधवारी स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह तीन बोटी शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी निघाल्या होत्या. याच वेळी एक बोट खडकावर आदळल्याने बुडली. या बोटीवरील 24 जणांना वाचवण्यात यश आले, तर एक जण बेपत्ता होता. बेपत्ता तरुणाचे नाव सिद्धेश पवार असे असून त्याचा मृतदेह सायंकाळी सापडला आहे.
शिवस्मारकाच्या शुभारंभाला गेलेल्या बोटीला अपघात, समुद्रात नक्की काय घडलं?
या बोट दुर्घटनेवरून राजकारण सुरू झाले असून विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, बोट दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.



























































