
मुंबईतील सिनेमागृहात बॉम्बस्फोट करण्याचे ट्विट करणाऱ्या तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. बनवारी सिंग असे त्याचे नाव असून तो मूळचा हरयाणाचा रहिवासी आहे.
बनवारीने ट्विटरवर कमांडो सिंग या नावाने अकाउंट उघडले होते. जानेवारी महिन्यात त्याने मॅडम चीफ मिनिस्टर हा चित्रपट ज्या सिनेमागृहात दाखवला जाणार आहे, तेथे बॉम्बस्फोट घडवू असे ट्विट केले. ते ट्विट मुंबई पोलिसांना टॅग केले. त्या ट्विटची दाखल घेत मुंबई पोलिसांनी त्या सिनेमागृहाची तपासणी केली असता ती अफवा असल्याचे उघड झाले. या घटनेची दखल घेत सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी कौशल्याचा वापर करून बनवारी सिंगची माहिती काढली. त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक हरयाणाला गेले. तेथून त्याला अटक करून मुंबईत आणले गेले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

























































