
खार पश्चिम येथे पाच मजली इमारतीचा संपूर्ण जिना कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या दुर्घटनेत अग्निशमन दल, ‘एनडीआरएफ’ने तातडीने बचावकार्य करून २१ जणांची सुखरूप सुटका केली. या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या.
खार जिमखाना येथे ‘बोहाला’ ही तळमजला अधिक चार मजली खासगी इमारत आहे. आज दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या तळमजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंतचा जिन्याचा भाग कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि एनडीआरएच्या दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुंबई अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, एनडीआरएफचे ४५ जवान असलेल्या दोन तुकड्या आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले. बचावकार्यात इमारतीमधून २१ जणांना बाहेर काढण्यात आले, मात्र भावना कसंत आंचन (५०) क सुरेखा भानुसाहेब लोखंडे (४०) या दोन महिला जखमी झाल्या. त्यांच्यावर वांद्र्याच्याच भाभा रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. या दुर्घटनेत या ठिकाणी खेळत असलेली एक मुलगी ढिगार्याखाली अडकली होती. या लहान मुलीला एनडीआरएफ क मुंबई अग्निशमन दलाच्या जकानांनी बाहेर काढले व तिला जवळच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माही मोतवानी (१०) असे या मुलीचे नाव आहे.
संपूर्ण इमारत केली रिकामी
दुर्घटनाग्रस्त पाच मजली ‘बोहला’ इमारत खासगी मालकीची होती. ही इमारत ४७ वर्षे जुनी आहे. इमारतीच्या जिन्याचा भाग कोसळल्याने आता संपूर्ण इमारत कलंडल्याने धोकादायक झाली आहे. यामुळे इमारतीमधून सर्व रहिवाशांना बाहेर काढून जवळच्या पालिकेच्या शाळेत शेल्टर उभारून राहण्यास दिले जाणार आहे. या इमारतीत राहणार्या रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य काढून दिल्यानंतर ही इमारत मुंबई अग्निशमन दल व एनडीआरएफच्या मार्गदर्शनाखाली पाडली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

























































